आष्टी मतदारसंघात आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने ३१ कोटींच्या रस्ते कामांना मंजुरी
********************************
********************************
आष्टी(प्रतिनिधी)
विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आ. सुरेश धस यांनी आष्टी मतदार संघातील रस्त्यांसाठी सुमारे ३१ कोटी रूपायांचा निधी मंजूर करून घेतला आहे.या रस्त्यांमुळे मतदार संघातील दळणवळणाला गती मिळणार असून आमदार धसांनी आणलेल्या कामांना नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या पुरवणी अर्थसंकल्प बजेट मध्ये आष्टी मतदारसंघात एकुण ३१ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजुरी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार , रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचे विशेष आभार आमदार सुरेश धस यांनी मानले आहेत.पुढील प्रमाणे मंजूर झालेले कामे व निधी
कोयाळ ते खुंटेफळ वाटेफळ रस्ता- ५ कोटी,लोणी ते कुंटेफळ वाटेफळ रस्ता - ५ कोटी,पुंडी ते शिरापूर रस्ता - ३ कोटी,बेलगांव ते मांडवा रस्ता- ३ कोटी,वाघळूज ते गटकळ वस्ती रस्ता - १.५ कोटी,मेहकरी ते पिंपळगाव दाणी रस्ता - १.५ कोटी,पिंपळा ते सुंबेवाडी रस्ता - १.५ कोटी,जामगांव ते दत्ता मंदिर रस्ता - २ कोटी,आष्टी ते सोलेवाडी रस्त्यावरील पुल बांधकाम करणे - २.५ कोटी,
प्रजिमा-१९ ते ब्राम्हणवाडी रस्ता - २ कोटी,दासखेड ते माळेवाडी रस्ता - २.५ कोटी,वडाळी ते मद्मापुरी रस्ता - १.५ कोटी असे कामे मंजूर झाले असून एकूण आष्टी मतदार संघातील रस्त्यांसाठी पहिल्याच दिवशी आमदार धसांनी दमदार काम करत ३१ कोटीचा निधी मंजूरू करून आणल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आ.सुरेश धस यांचे आभार व्यक्त केले आहे.

0 टिप्पणियाँ