आष्टी शहरात 12 हायमॅक्स मंजूर
आष्टी(प्रतिनिधी)
गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी शहरातील प्रमुख मार्ग तसेच मुख्य चौकामध्ये हायमॅक्स बसवण्याची मागणी वारंवार व्यापारी वर्ग तसेच शहरातील नागरिकांकडून करण्यात येत होती. याच अनुषंगाने आ. सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नातून आष्टी शहरात 12 हायमॅक्स मंजूर झाले असून विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी 40 फूट उंचीचे मनोरे उभारले जाणार असून त्यावर 8 फ्लड लाईट लावण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली.
या हायमॅक्सचे प्राथमिक भूमिपूजन आज दि.६ रोजी गुरूवारी सकाळी १० वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष जिया बेग, उपाध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक रंगनाथ धोंडे,गट नेते किशोर झरेकर,नगरसेवक शरीफ शेख,नगरसेवक समीर शेख,नगरसेवक सुरेश वारंगुळे,जालिंदर वांढरे,अरुण निकाळजे, सादिक कुरेशी,दीपक निकाळजे, राजू निकाळजे,इंजि.गहिनीनाथ शिरसाठ,रज्जू नाना,अमीन दादा,अस्लम बनारस व इतर मान्यवर उपस्थित होते.
शहरातील या भागात बसविले जाणार हाईमॅक्स
***************************
आण्णाभाऊ साठे चौक (किनारा चौक), छत्रपती शिवाजी महाराज चौक,महात्मा फुले चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,दत्त मंदिर,राम मंदिर,उमर नगर (उमर मज्जिद), बौद्ध विहार, टीपू सुलतान चौक, शनी मंदिर चौक ,शेकापूर चौक (अकबर शेठ लाकडी मशीन ) व रमाबाई आंबेडकर चौक या ठिकाणी बसविले जाणार असल्याचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी सांगीतले.

0 टिप्पणियाँ