खुंटेफळ येथे शेतकर्यांचे एक दिवशीय लाक्षणीक उपोषण





आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे कृष्णा भिमा स्थिरीकरण योजने अंतर्गत साठवण तलावाचे काम गेल्या १४ वर्षांपासून सुरु आहे . या साठवण तलावासाठी २०१३ पुर्वी शासनाने 7 लाख रु हेक्टर ने शेतकर्यांच्या जमीनी खरेदी घेतल्या . परंतु सध्या त्याच प्रकल्पासाठी ३५ लाख रु . हेक्टरी प्रमाणे घेतल्या जात आहेत . या आधीच्या शेतकर्यांना फक्त जमीनीसाठी सानुग्रह अनुदान फरक म्हणुन २८ लाख रु . प्रति हेक्टरी देण्यात यावे या मागणी साठी खुंटेफळ येथे शेतकर्यांचे एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले .

खुंटेफळ साठवण तलावासाठी २०१३ पुर्वी संपादित करण्यात आलेल्या जमीन धारकांच्या न्यायासाठी सोमवार दि . ४ डिसेंबर रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण सकाळी ८ ते ५ या वेळेत खुंटेफळ येथे मारूती मंदीरात करण्यात आले . या प्रसंगी प्रदिप थोरवे यांच्या नेतृत्वाखाली खुंटेफळ , पुंडी , सोलापुरवाडी येथील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते . याप्रसंगी अनेक खातेदारांचे वैयक्तीक अर्ज भरून घेण्यात आले . न्यायालय व सरकारकडे पाठपुराव्या संबंधी निर्णय घेण्यात आला .



यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी या भागातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या खंबीर पाठीशी उभे राहुन त्यांना न्याय मिळवून देण्यास सर्वोतपरी प्रयत्नशिल राहू असे आश्वासन दिले .

यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर नाना , परमेश्वर काका शेळके , सुभाष थोरवे , डॉ . महेश नाथ , एपीआय ढाकणे , प्रा . राम बोडखे , मंडल अधीकारी औंदकर , शैलेश थोरवे , आदित्य थोरवे , पोपट थोरवे , आदित्य काकडे , सुनील गायकवाड , शंकर थोरवे , परमेश्वर थोरवे , भाऊसाहेब पठाडे , ज्ञानेश्वर चौधरी , विलास गवळी वाळके सर आदी मान्यवर व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते .