आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघासाठी हिवाळी अधिवेशनात 121 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी
आ.बाळासाहेब आजबे यांची माहिती
आष्टी प्रतिनिधी
मतदारसंघातील विविध विकास कामासाठी विशेष करून रस्ते व प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामधील पुरवणी मागण्यांमध्ये आष्टी मतदार शिरूर तालुक्यातील विविध विकास कामासाठी 121 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विशेष सहकार्याने आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील रस्ते विकास व प्रशासकीय इमारत व निवासस्थान या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्यांमध्ये 121 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली असून यामुळे मतदार संघातील दळणवळणाचा व शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान व कार्यालयाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे आज दिलेल्या पुरवणी मागणीतील मंजुरी मध्ये
1)जिल्हा सरहद्द आलहणवाडी - देवळाली -दादेगाव -कडा -टाकळी- रुई वाकी रस्ता प्रतिमा 4 की मी 18/00 मध्ये लहान पुलाचे काम करणेसाठी 02 कोटी रुपये,
2) पिंपरी- फत्तेवडगाव- शिराळ प्रा जी मा 04 किमी ते 200 मध्ये 04 कोटी रुपये,
3)देसूर -चिंचाळा रस्ता ग्रामा 66 किमी 00 ते चार 00 मध्ये सुधारणा करणे 04 कोटी रुपये, 4) रामा 56 ते थेरला बेन्सुर भायाळा वाघिरा रस्ता प्रतिमा 23 ते मजबुतीकरण व डांबरीकरण करणे किमी 8/00 ते 10/ 400 तालुका पाटोदा 02 कोटी रुपये, 5) रामा 211 ते पालवन -नागझरी -बिनसुर -भायाळा वैद्यकींनी -वैजाला -पाचंग्री प्रजिमा 31 किमी 39/00 ते 43/00 मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 04 कोटी रुपये,
6) रामा 62 ते नांदिवली -ब्रम्हनाथ येळम -बावी- आनंदगाव -राक्षसभुवन -रोपुर प्रतिमा 13 किमी 00 ते 7/700 मध्ये सुधारणा करणे तालुका शिरूर 04 कोटी रुपये,
7) नांदेवली -ब्रम्हनाथ येळम बावी- आनंदगाव -राक्षस भुवन नुपूर -रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे प्रतिमा 13 किमी ते 07 किमी मध्ये तालुका शिरूर 01 कोटी 50 लाख रुपये,
8)रामा 57 शिरापूर -टाकळी - निमगाव ते रामा 54 इजिमा 18 किमी00 ते 15/ 500 मध्ये सुधारणा करणे तालुका आष्टी 05 कोटी रुपये
9)केळसांगवी ते इमानगाव ग्रामीण मार्ग 260 किमी 00 ते 2/500 मध्ये सुधारणा करणे तालुका आष्टी 02 कोटी 50 लक्ष, 10)केळ ते देऊळगाव घाट तीन किमी 00 ते2/ 500 मध्ये सुधारणा करणे तालुका आष्टी 02 कोटी 50 लक्ष,
11)उखंडा कला ते खामकरवाडी 75/00 ते 400 मध्ये सुधारणा करणे तालुका शिरूर 03 कोटी रुपये
12)रामा 54 शिराळ हिंगणी प्रामा ११७ किमी 400 ते 700 मध्ये सुधारणा करणे तालुका आष्टी 03 कोटी रुपये
13)आष्टी न्यायालय याच्या मा. न्यायाधीश निवासस्थानासाठी01 कोटी 55 लक्ष रुपये
14) पाटोदा येथे महसूल कर्मचारी निवासस्थानासाठी 14 कोटी 38 लाख 70 हजार, 15)आष्टी येथील महसूल कर्मचारी निवासनासाठी 13 कोटी 19 लक्ष 80 हजार
16) शिरूर येथील महसूल कर्मचारी निवासनासाठी 08 कोटी 66 हजार
17)पाटोदा येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारत बांधकामासाठी 23 कोटी 95 लाख रुपये
18) शासकीय आदिवासी आश्रम शाळा शेडाळा ता आष्टी येथे शालेय इमारत बांधकाम करणे 15 कोटी रुपये.
19) जिल्हा सर हद्द हातोळण -पारोडी- वाहिरा- पिंपरी- कानडी- शिराळ -आष्टी नाबार्ड अंतर्गत मंजूर 03 कोटी 50 लक्ष रुपये च्या कामांचा समावेश असून या मंजूर कामामुळे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील मोठ्या प्रमाणावर दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील 121 कोटीच्या विकास कामांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब व सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने मी आभार मानतो असे शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

0 टिप्पणियाँ