कमी झालेल्या दूध दर वाढीसाठी.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्री यांचे समवेत बैठकीचे आयोजन.. आ.सुरेश धस यांच्या मागणीची शासनाने घेतली दखल..
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये
दुधाचे दर झपाट्याने कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे ३-५फॅट आणि ८-५ एस.एन.एफ.असलेल्या दुधाला ४०.०० रुपये प्रति लिटर भाव मिळत असताना शेतकऱ्यांनी.. पंजाब, हरियाणा, कर्नाटक,आणि तामिळनाडू या राज्यातून मोठ्या प्रमाणावर गायी खरेदी केल्या. ..त्यामुळे दूध उत्पादन वाढले.. खाजगी आणि सहकारी दूध संकलन करणाऱ्या संस्थांकडे मोठ्या प्रमाणावर दूध पावडर शिल्लक असून जागतिक बाजारपेठेमध्ये दुधाचे पावडरचे भाव कमी झाल्यामुळे आणि बटरचे भाव कमी आल्यामुळे.. दर्जेदार दूध असून देखील २४.०० रुपये लिटर पर्यंत दर खाली आलेले आहेत.. त्यामुळे या अडचणीत आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्यात यावी यासाठी आ.सुरेश धस यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी शासनाकडे निवेदन दिले असता.. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सह तात्काळ बैठक आयोजित करावी असे आदेश दिले.. आहेत.. आमदार सुरेश धस यांनी आपल्या निवेदनामध्ये.. सहकारी दूध संघाला पाऊच पॅकिंगचे दूध सोडून जे दूध शिल्लक आहे त्या दूध उत्पादकाला शासनाने ५.०० रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे..
तसेच खाजगी आणि सहकारी दूध संघाकडे शिल्लक राहिलेल्या दूध पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीसाठी प्रति किलो ५०.०० रुपये अनुदान द्यावे..
या दोन मागण्या केलेल्या आहेत..
अशा प्रकारच्या उपाययोजना तातडीने केल्या तरच..
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय असलेला दूध व्यवसाय टिकून राहील आणि आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल..
याबाबत काल विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दूध दरवाढीच्या मागणीबाबत मोठा आर्थिक भार शासनाला सोसावा लागणार असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आपण स्वतः आणि सत्ताधारी पक्षाचे आणि विरोधी पक्षातील काही सदस्य यांची संयुक्त बैठक मंगळवार दिनांक १२ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले..
या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे..

0 टिप्पणियाँ