वाहुन जाणारा पाऊस थांबविण्यासाठीच आम्ही कोपबंधारे बांधण्यास प्राधान्य देणार---- आ.बाळासाहेब आजबे

 *वाहुन जाणारा पाऊस थांबविण्यासाठीच आम्ही कोपबंधारे बांधण्यास प्राधान्य देणार---- आ.बाळासाहेब आजबे*

----------------------------------------


Ajbe


आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुका हा कायमच दुष्काळग्रस्त असून या ठिकाणी प्रत्येक वर्षी पावसाचे प्रमाण हे कमी राहिले आहे.जो पाऊस होतो त्याचे पाणी वाहून जात असल्यामुळे त्याचा तालुक्यात कसल्याही प्रकारचा फायदा होत नव्हता. त्यामुळे आपण तालुक्यामध्ये विविध ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे तयार करत आहोत. याच बंधाऱ्यामुळे तालुक्यामध्ये जलसमृद्धी होणार आहे.वाहुन जाणारा पाऊस थांबविण्यासाठीच आम्ही कोपबंधारे बांधण्यास प्राधान्य देणार असे प्रतिपादन आ.

बाळासाहेब आजबे यांनी केले.

 

    आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील १ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आणि ९५ लाख रु चा नांदुरा विठ्ठलाचे येथे कोपबंधारा भुमीपुजन प्रसंगी बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषद सदस्य सतीशआबा शिंदे, सुनिल नाथ,ता.यु.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले,माजी सरपंच संजय विधाते,परसराम विधाते,उध्दव विधाते,जगन्नाथ ढोबळे,हरिभाऊ दहातोंडे,संदिप सुंबरे ,महादेव डोके,शिवाजी शेकडे,बाबासाहेब भिटे मान्यवर उपस्थित होते.

     आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील १ कोटी ७४ लक्ष रुपये कोल्हापुरी बंधारा १ कोटी ७० लक्ष रुपये वाघळूज कोपबंधारा २ एक कोटी ६४ लाख रुपये, वाघळूज ग्रेटेड बंधारा ३५ लाख रुपये व नांदूर येथील कोपबंधारा ९५ लक्ष रुपये या कोल्हापुरी पद्धतीच्या सर्व कामाचे भूमिपूजन सोमवारी आ. बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते संपन्न झाले.

     पुढे बोलताना आ.आजबे म्हणाले की,डोंगरगण या गावांमध्ये आज १ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या बंधाऱ्याचे उद्घाटन झाले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तालुक्यामध्ये पाऊस पडतो थोड्याफार प्रमाणात मात्र ते पाणी वाहून जाते.पाणी वाया जात असल्याची अडचण लक्षात घेऊन हा बंधारा तयार करत असून आणखी दोन बंधारे मार्च अखेरपर्यंत डोंगरगण गावामध्ये मंजूर करणार असल्याची माहिती दिली. दुष्काळी भागासाठी या बंधाऱ्यांचा फायदा होणार असून मतदारसंघात ६८ कोटी रुपयांचे बंधारे मंजूर झाले आहेत. आणखी मार्च अखेरपर्यंत ३० कोटी रुपयांचे बंधारे होणार आहेत. यामुळे नदीला वाहून जाणारे पाणी आडविल्यामुळे शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तसेच गुत्तेदारांनी सदरील बंधाऱ्याचे कामे लवकरात लवकर व दर्जेदार करून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी युवा कार्यकर्ते दिलीप चव्हाण यांनी प्रास्ताविकात आ. आजबे यांनी गावांमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती दिली. सभामंडप रस्ता पाण्याची टाकी या सर्व विकास योजना आमदार आजबे यांनी प्रभावीपणे राबविल्यामुळे गावचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महादेव डोके,भाऊसाहेब घुले, संतोष गुंड,शिवाजी शेकडे,सरपंच भीमराव बोडखे, सरपंच अर्जुन काकडे,विशाल झांबरे,ज्ञानेश्वर वाघ,परमेश्वर कर्डिले,भीमराव चव्हाण,काकासाहेब कर्डिले, इंजि.काकडे, कॉन्टॅक्टर राम गोंदकर,राम कर्डिले ,बाळासाहेब पिसाळ ,पप्पूशेठ लोखंडे, संजय चौधरी, शामराव फसले, सचिन कोहक, दिलीप चव्हाण, भरत जाधव, संजयदादा विधाते, सरपंच उद्धव विधाते, विधाते छबू, देवा रिंगणे ,रावसाहेब गुंड, उत्तम चौधरी,तुळशीराम गुंड, नवनाथ राठोड ,गणेश पवार ,शिवाजी गाडे, रावसाहेब दळवी, बबलू शेठ,संजय चौधरी, चंद्रकांत वामन, नवनाथ शेलार ,दिलीप चव्हाण ,बंडूशेठ काका ,नामदेवमामा शेळके,डॉ. गव्हाणे, विशाल भामरे, गणेश पवार, नवनाथ शेलार, शामराव कसले,सतीश विरकर, दादा राऊत, पप्पू गवळी, ज्ञानेश्वर वाघ ,परमेश्वर कर्डिले यांच्यासह डोंगरगण,

वाघळूज,नांदूर परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नांदुर येथे संचलन व आभार दादा राऊत  यांनी मानले.





एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ